ओझर मर्चन्ट्स बँकेत आपले स्वागत आहे ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> ओझर मर्चंट्स बँकेची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> बँकेची वेबसाईट "ojharmerchantbank.com" चे उद्घाटन करून प्रकाशित करण्यात आली. ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> खाते धारकांसाठी आनंदाची बातमी !!!! बचत आणि चालू खात्यासाठी एटीएम कार्ड सेवा लवकरच सुरू.
Presidential Occult img

सन्माननीय सभासद बंधू भगिनिंनो.

सस्नेह नमस्कार,

आपल्या बँकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस संचालक मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचे मी मनापासुन स्वागत करतो. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आपणा सर्वांशी संवाद सादताना व आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करतांना मला अतिशय आंनद होत आहे. सन १९६१ साली स्थापन झालेल्या आपल्या बँकेने बघता बघता ६३ व्या वर्षात पदार्पण केले आहे याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे.

आपल्या समोर हा अहवाल सादर करण्या अगोदर आपणास सांगण्यास आनंद वाटतो की, बँकेस सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील मानाचा समजला जाणारा असा सर्वोत्तम बँकेसाठी असलेला "बँको ब्लु रिबन पुरस्कार" जाहीर झाला आहे व बँकेच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. यातच भारताच्या चांद्रयान ३ ने दि. २३/०८/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रभुमीच्या दक्षिण धृवावर चाद्रयान उतरविणारा जगातील पहिला देश भारत ठरलेला आहे. आपल्या सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ व कर्मचारी यांचे कडून भारतीय अवकाश शास्त्रज्ञ यांचे मनःपुर्वक अभिनंदन.

सहकार क्षेत्रात काम करताना त्यातल्या त्यात बँकिंग सारख्या क्षेत्रात काम करत असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचा सहकार क्षेत्राविषयी असलेला दृष्टिकोन व कडक केले जात असलेले निर्बंध यातुन मार्ग काढत सभासद, ठेवीदार, कर्जदार, अधिकारी व सेवक वर्ग यांना बरोबर घेवून काम करावे लागते. आज बँकिंग क्षेत्रात गतिमान स्पर्धा सुरु आहे, त्या साठी व्यवसाय वाढीकरीता नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी, निश्चित उपाययोजना करण्याची गरज आहे. यात प्रामुख्याने ग्राहक सेवेतील गुणात्मक बदल करुन उत्तम प्रकारची सेवा देण्याचा आमचा मानस आहे. उत्तम ग्राहक सेवा व व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर "आपली बँक" म्हणून आपण हे वेगळेपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सर्वजण वेळोवेळी करत असलेले मार्गदर्शन, सहकार्य व विश्वासपूर्ण प्रेम आमच्या साठी उर्जा व बळ देणारे आहे याचा मी आर्वजून उल्लेख करतो.

आपली बँक ग्रामिण भागातील असल्या कारणाने अर्थ व्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे, बँकेच्या कार्यक्षेत्रातील शेती ही द्राक्ष बाग, कांदा व टोमॅटो या नगदी पिकांवर अवलंबून आहे, त्यातच मागील दोन वर्षा पासुन कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ या परिस्थितीचा परिणाम द्राक्ष व इतर शेती उत्पन्नावर झाला. त्याचा बँकेच्या वसुलीवर व ठेवीवर परिणाम झालेला आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आपल्या बँकेस ३ वर्षानंतर 'अ' वर्ग प्राप्त झाला आहे. मागील ३ वर्षा पासुन सतत ब वर्ग असल्याने व पतसंस्थाना 'अ' वर्ग असलेल्या बँकेतच गुंतवणूक करण्याचे सहकार खात्याचे बंधन असल्याने, आपल्या कार्यक्षेत्रातील पतसंस्थांच्या गुंतवणूकीचा आपल्या ठेवीवर परिणाम झालेला आहे. सन २०२२-२३ मध्ये आपल्या बँकेस जवळजवळ ७ वर्षा नंतर १ कोटीच्या वर नफा झाला आहे. बँकेस या पुढेही सतत 'अ' वर्ग व १ कोटीच्या वर नफा मिळविण्याचा आमचा संकल्प आहे.

मी व माझ्या सहकारी संचालक मंडळाने पदभार स्विकारल्या नंतर बँकेस 'अ' वर्ग मिळे पर्यंत संचालक मंडळ बैठींचा व इतर बैठकांचा कोणताही भत्ता घेणार नाही, असा निश्चय केला होता व तो आजतागायत आम्ही पाळत आहोत

भविष्य कालीन नव्या ग्राहकाभिमुख योजना घेवून विकासाचे गुणात्मक यशस्वी पाऊल म्हणून म्हणून बँकेने क्यु.आर कोड सिस्टीम नव्यानेच सुरु केली असुन लवकरच मोबाईल बँकींग, ए.टी.एम कार्ड या सारख्या ग्राहकाभिमुख सुविधा सुरु करत आहोत. ठेवीदाराने कमीत कमी रक्कम आपल्या खात्यात ठेवल्यास त्यांना विना शुल्क आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी. सारख्या सुविधा विना शुल्क उपलब्ध केल्या आहेत. बँकेच्या भविष्यकालीन वाटचालीकडे आपण आशेने बघूया व यात सहभागी होऊया.

बँकिंग विषयक कामकाज करताना बँकेचे अधिकारी सेवक हे महत्वाचा घटक आहेत किंबहुना बँकरुपी रथाचे ते एक चाक आहे. अधिकारी व सेवक यांचा विचार करत असताना त्यांना जानेवारी २०२१ पासुन १८% पगारवाढ देण्यात आली आहे. अधिकारी व सेवक यांच्याकडून अजून चांगल्या कामाची व सहकार्याचा अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा देवून माझे मनोगत पुर्ण करतो..

जय हिंद...! जय महाराष्ट्र...!! जय सहकार...!!!

आपला स्नेहांकित

राजेंद्र दत्तात्रय शिंदे
चेअरमन

दि ओझर मर्चन्टस् को-आप बँक लि., ओझर (तांबट)